About Us

shape
About BBF
shape
आमच्या बद्दल थोडंसं !

उद्योगसिंह

लायन्स क्लब ही शंभर वर्षाहून जास्त काळ कार्यरत असणारी सेवाभावी संस्था आहे. सर्व जगभरात याचे साधारणपणे 1368455 इतके तर 3234D1 या आमच्या प्रांतामध्ये 2598 इतके सदस्य आहेत.

उद्योगसिंह,म्हणजेच लायन्स क्लबमधले उद्योजक, हा लायन्स क्लब कोल्हापूर राजारामपुरी यांनी सुरु केलेला एक उपक्रम आहे , ज्या योगे लायन्स क्लबमधल्या सर्व लहान मोठ्या उद्योजकांना ,आपल्या व्यवसायाद्वारे एकत्र येण्याची संधी मिळेल. आपला व्यवसाय कोणताही असो , आपण जर लायन सदस्य असाल तर आपण उद्योगसिंह आहातच! छोट्या व्यावसायिकांना किंवा घरगुती उद्योजकाना , त्यांची उत्पादने जगासमोर आणण्यासाठी तर ही सुवर्णसंधी असेल.

आम्ही इथे आपल्याला एक असे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत ,ज्या योगे आपण फक्त आपल्याच लायन प्रांतांमधील नव्हे तर सर्व जगभरामधील लायन सदस्यांबरोबर संलग्न होऊ शकता .

आणि याच प्रयत्नांमधून , आपण सर्वजण ,सेवाकार्याबरोबरच एका उद्योजकतेच्या धाग्याने सुद्धा बांधले जाणार आहोत.

शेवटी सेवाकार्ये करण्यासाठी, या देशासाठी काही करण्यासाठी आपल्याला व्यक्तिगतरित्यासुद्धा सक्षम होण्याची गरज आहे आणि हेच या संकल्पनेचं उद्दिष्ट आहे.

आमच्या बरोबर संलग्न का व्हायचे ?

आपण सर्वच जण लायन्स क्लबचे सदस्य आहोत,आपण सर्वच जण सेवाकार्ये करत होतो ,करत आहोत आणि करत राहणारच आहोत, पण आपली ही मैत्री एवढीच का मर्यादित ठेवायची ? चला , आपण या ही पलीकडे जाऊ या. या समाजासाठी आपल्याला काही करायचं असेल, तर आपणही आर्थिक दृष्ट्या सक्षम असायला हवं ,हे सत्य आपण नाकारू शकतच नाही आणि एक लायन सदस्य म्हणून, आपण आपल्याच सहयोगी सदस्यांना उद्योग धंद्यामधल्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो, तर पर्यायाने आपली लायन्स संघटना सुद्धा सक्षम बनेल आणि आपण मानवतेची सेवा अजून चांगल्या प्रकारे करू शकू. या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन या संकल्पनेचा उदय झाला आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे.

Icon

Our Mission

Bring all the lions in businesses together to create opportunities .

Icon

Our Vision

वसुधैव कुटुंबकम ! Spread this movement worldwide.